The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील रेगेगाव येथील शेतकरी आनंद तुकाराम दखने यांना वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गाईचा झालेला मृत्यू या नुकसानीपोटी ३७, ५०० रुपये धनादेश प्रदान करण्यात आला. २४ जून २०२५ रोजी मुरुमगाव वनपरिक्षेत्र कार्यालय (पश्चिम) येथे हा धनादेश वितरण कार्यक्रम पार पडला.
०१ मे २०२५ रोजी रेगेगावजवळील जंगलात शेतकऱ्याच्या गाईवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले होते. या घटनेची माहिती शेतकरी दखने यांनी तत्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच मुरुमगाव (पश्चिम) वनपरिक्षेत्राच्या पथकाने त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा व चौकशी प्रक्रिया पूर्ण केली. कार्यवाहीत कुशलता दाखवत अवघ्या एका महिन्यात नुकसानभरपाईचा ३७,५०० रुपयांचा चेक शेतकऱ्याच्या हाती सोपवण्यात आला.
या वितरण कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. लताताई पूगांटे, वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. कराडे मॅडम, क्षेत्रसहाय्यक बेहरे, उसेंडी, बोरकूटे, वनरक्षक रायसिडाम तसेच तालुका पत्रकार मो. शरीफभाई कुरैशी व लाभार्थी शेतकरी आनंद तुकाराम दखने हे उपस्थित होते.
वनविभागाच्या तत्परतेमुळे नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #Dhanora #WildlifeCompensation #FarmerSupport #LeopardAttack #ForestDepartment #Murumgaon #DhanoraNews #AnimalAttackRelief #RuralNews #FarmerRights #GovernmentAid