– घटनेने चंद्रपूर पोलिसात खळबळ
The गडविश्व
चंद्रपूर, दि. ०८ : चक्क पोलिसांवर चाकूने हल्ला करीत खून केल्याच्या घटनेने चंद्रपूर शहर हादरले असून या घटनेने चंद्रपूर पोलिसात खळबळ उडाली आहे. दिलीप चव्हाण असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे तर संदिप चाफले हे गंभीर जखमी आहेत.
चंद्रपूर शहरातील पठानपुरा मार्गांवरील पिंक बार अँड रेस्टॉरंट येथे ७ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास काही मद्यपी दारू पित असताना पोलिस कर्मचारी दिलीप चव्हाण व संदिप चाफले हे आपले कर्तव्य पार पाडून बरं मध्ये गेले. दरम्यान मद्यपी मोठ्या आवाजात बोलत असताना पोलीस कर्मचारी यांनी त्यांना हळू बोला असे धावले असता या शुल्लक कारणावरून त्यांच्याकडे बाचाबाची झाली. याचे रूपांतर वादात झाल्याने मद्यपी आरोपीने आपल्या ४ – ५ सहकाऱ्यांना फोन करून बोलवून पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच पोलिस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसरे पोलीस कर्मचारी संदिप चाफले यांना सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेने चंद्रपूर पोलिसात खळबळ उडाली असून या घटनेने शहर हादरले आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपी आकाश शिर्के, मल्लिक व इतर ५ आरोपीना अटक करण्यात आल्याचे कळते.
