The गडविश्व
नागपूर दि. ३० : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी समाजाच्या न्यायहक्कांसाठी नागपूर येथील संविधान चौकात ३० ऑगस्टपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतील ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, आमदार डॉ. परिणय फूके, महासचिव सचिन राजुरकर, कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, तसेच प्रकाश साबळे, राहुल तायडे, प्रवीण वानखेडे, अनिल ठाकरे, गुणेश्वर आरीकर, सोनोने सर, अनिल कंठीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हा सचिव सुरेश भांडेकर, पुरुषोत्तम मस्के, प्रा. त्र्यंबक करोडकर, वासुदेव कुडे, उमेश आखाडे, पांडुरंग नागापुरे, घनश्याम जकुलवार, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाध्यक्षा मंगला कारेकर, युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार, तसेच महेंद्र लटारे, प्रफुल आंबोरकर, संदीप चापले, पंकज खोबे, अंकुश मोगरकर, वरुण चेतन भोयर, मिथुन शेबे, आकाश सोनटक्के यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपोषणाला हजेरी लावली.
नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपोषणाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, ओबीसींच्या हक्कांच्या लढ्याला अधिक जोर मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ओबीसी #साखळीउपोषण #नागपूर #राष्ट्रीयओबीसीमहासंघ #गडचिरोली #विदर्भ #OBCRights #OBCProtest #MaharashtraNews #ConstitutionChowk














