The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात डॉ. नेहा भार्गव नागपूर यांच्या नेतृत्वात गर्भाशय मुख (कोल्पोस्कोपी) शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येत आहे. डॉ. नेहा भार्गव यांना स्त्री रोग विशेषज्ञ आणि प्रसूति रोग विशेषज्ञ म्हणून ८ वर्षाचा अनुभव आहे.
पांढरा पाणी जाणे, लघवीमध्ये आग होणे, मध्ये मध्ये लघवीद्वारे लाल पाणी जाणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी सर्च रुग्णालयात येउन आरोग्य तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या तपासणी अंती ज्या रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असेल त्यांची सर्च रुग्णालयात मोफत ऑपरेशनपूर्व तपासणी व ऑपरेशन पूर्णपणे मोफत होईल. तसेच सर्च मधील प्रयोगशाळा तपासणी व आवश्यकता असलेली सर्च बाहेरीली तपासणी उदा. सोनोग्राफी, सिटी स्कॅन इत्यादि मोफत दरात करण्यात येईल. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेस सुविधा मोफत दिल्या जाईल, तरी रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन आरोग्य तपासणी करून ऑपरेशनची पूर्व तपासणी करून घ्यावी व सर्जरी कॅम्प करिता आपले नाव नोंदवावे. जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत ऑपरेशन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.१६ ते ३१ मे दरम्यान उन्हाळी सुट्टी निमित्त रुग्णालय बंद राहिल.