भाऊ ‘वादळ वारा क्षणभर लाईट जाते तासभर’ : गडचिरोली शहरातील काही तास बत्ती गुल

411

– ऐन उन्हाळ्यात वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त
The गडविश्व
गडचिरोली, २१ एप्रिल : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २० एप्रिल रोजी रात्रो ८ ते ९ वाजताच्या दरम्यान वादळ वाऱ्यासह गडचिरोली शहरात पावसाने हजेरी लावली मात्र क्षणभर वादळ वाऱ्याने ९.३० वाजतापासून मध्यरात्री १२ वाजता पर्यंत शहरातील काही भागातील बत्ती गुल झाल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहे. ‘वादळ वारा क्षणभर लाईट जाते तासभर’ अशी अवस्था झाल्याने नागरिक मात्र गर्मीने आणि डासांपासून हैराण झाले आहेत.
सूर्य तापत असल्याने तापमानात वाढ झाली आहे अशातच ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित झाल्याने गर्मीने अंगाची लाही लाही होते असते. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २० एप्रिल रोजी रात्रो वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही क्षण वादळी वारा व पाऊस आल्याने शहराच्या काही भागातील सुमारे ९.३० वाजता पासून बत्ती गुल झाली. मध्यरात्री १२ वाजता पर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला नव्हता. वीज पुरवठा खंडीत होण्याचे कारण गडचिरोली येथील वीज वितरण कार्यालयात फोनद्वारे विचारणा करिता संपर्क केला असता फोन अधिक काळापासून व्यस्त स्थितीत आढळून आला. त्यामुळे वीज खंडित होण्याचे कारणही कळू शकले नाही. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने मात्र समाजमाध्यमांवर तसेच नागरिक ‘ वादळ वारा क्षणभर आणि लाईट जाते तासभर’ अशा अशाप्रकारे चर्चा करतांना आढळून आले.
जिल्ह्यातील इतर भागातही अनियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कुरखेडा तालुक्यातील काही भागातील वीज पुरवठा अनेक तासांपासून खंडित झाल्याने तालुक्यातील नागरिक तालुकास्थळावरील वीज वितरण कार्यालयात दाखल होत रोष व्यक्त केला होता. कोणतीही सूचना न देता वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक संतप्त होत असतात तर जिल्ह्यातील काही भागात अनेक दिव वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार तसेच अनियमित भरनियमन होत असल्यानेही नागरिक त्रस्त झाले आहेत.

(the gdv) (the gadvishva) (Bro, the wind goes off for a moment, the light goes on for an hour: Batti Gul in Gadchiroli city)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here