– २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
गडचिरोली, १९ जुलै : जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा रक्त पेढीत रक्तताची कमतरता भासत असल्याने स्वयं रक्तदाता जिल्हा समिती चे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांनी पुढाकार घेत उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे बुधवार १९ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत २१ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
श्रेयस जोशी, कवीश्वर खोब्रागडे, स्वयम कांबळे, संकेत टीचकुले, हर्षल चौके, पंकेश किरंगे, अरविंद डूमरे, तुषार झुरे, दिगंबर चौधरी, योगेश देविकर, ओमप्रकाश साळवे, निकेश हेमके, योगेश धकाते, शुभम दुमाणे, अतुल कुथे, श्रेयस सिद्दमवार, प्रियांश तिजारे, संकेत वाकडे, अमरदिप सौंदरकर, यासिन शेख, आकाश कुथे यांनी शिबिरात रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.
डॉ. छाया उईके, डॉ. आनंद ठीकरे सर, डॉ. राऊत, के. टी. किरणापुरे, मुकूल खेवले, ज्योती खेवले, राजेश्री राऊत यांनी शिबिराचे उद्घाटन केले. तसेच परिचारिका माया पारधी, सरिता निकेसर सिस्टर यांनी रक्तदान शिबीराचे व्यवस्था करून दिली. देवेंद्र कुथे, मनोज गेडाम, प्रफुल्ल खापरे, प्रफुल्ल मोगरे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले.
स्वयं रक्तदाता जिल्हा समिती ही जिल्हाभरात रक्तदान शिबिर, रक्तदानाबाबत उचित मार्गदर्शन शिबीर राबवित असते. या माध्यमातून अध्यक्ष चारुदत्त राऊत यांनी जिल्हाभरात अनेक शिबिरे राबवून अनेक रक्तदात्याना प्रोत्साहित केले आहे. तसेच या समितीच्या माध्यमातून वेळेवर रुग्णाला रक्ताचा पुरवठा सुद्धा करण्यास मदत केली जाते. गरोदर महिलांसाठी डिलिव्हिरी दरम्यान रक्ताची गरज भासत असल्यास समितीच्या माध्यमातुन विशेष सोय करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याने जिल्हाभरासह इतरही जिल्ह्यात रक्तदाते वेळेवर रक्तदान करण्यास पुढे येत असतात. समितीचे अध्यक्ष चारुदात्त राऊत यांच्यासह तसमितीच्या इतर सदस्यांच्या या कार्याची सर्वत्र कौतुक केले जात आहे तसेच नवनवीन रक्तदाते घराघरात तयार करण्याचा या समितीचा मानस आहे.
(the gdv, the gadvishva, blood donet camp armori, gadchiroli news, charudatt raut, swaym raktdata samiti)