तालुकास्तरावर युवतींना मिळणार ‘राजमाता जिजाऊ युवती स्वरंक्षण प्रशिक्षणाचे धडे

134

The गडविश्व
गडचिरोली, ९ जुलै : मंत्री, महिला व बाल विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली १५ जून २०२३ रोजी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती सदर आढाव्या दरम्यान मंत्री मंगलप्रभाग लोढा यांनी राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निघृण हत्या व हिंसाचार याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच अलीकळील काळात महिला व मुलींवर होणारे कृर हिंसाचार व त्यातुन त्यांची केली जाणारी हत्या हे शासना समोरील व समाजा समोरील आव्हान ठरत आहे त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार दिनांक 23 जुन 2023 महिला व बालविकास विभाग शासन निर्णय अन्वये राज्यातील प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी 1000 मुलींना राजमाता जिजाऊ युवती स्वरंक्षणाचे धडे देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाला शाळकरी व महाविदयालयी वय 15 ते 25 वयोगटातील युवती यांना प्रत्येक तालुकानुसार 1000 याप्रमाणे युवतींना प्रशिक्षकाव्दारे तिन दिवशीय प्रशिक्षण देवून प्रमाणपत्र देणार आहे. पहिल्या दिवशी महिला व मुलींवरील हिंसाचार – संसकल्पना व सदयास्थिती आणि तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके याविषयावर मार्गदर्शन करणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण आणि आधुनिक प्रशिक्षण या संदर्भात प्रशिक्षण मिळणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक सराव मिळणार आहे. त्याअनुषांगाने जिल्हा महिला व बालविकास कार्यालय गडचिरोली व विद्यार्थी निधी ट्रस्ट, तसचे ऑल इंडीया थागसा असोशिअन आणि गोंडवाना विदयापीठ, शिक्षण विभाग, यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हयातील पहिला उदघाटनीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद हॉयस्कुल, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला वसंत विदयालय गडचिरोली, विदयाभारती हॉयस्कुल गडचिरोली, शिवाजी हॉयस्कुल विज्ञान कनिष्ठ महाविदयालय गडचिरोली, जि.प. हॉयस्कुल गडचिरोली, राणी दुर्गावती कन्या हॉयस्कुल गडचिरोली, महिला महाविदयालय गडचिरोली येथील विदयार्थीनी सदर कार्यक्रमात सहभागी होणार
आहेत. तरी सदर प्रशिक्षणाचा जिल्हयातील 15 ते 25 वयोगटातील महाविदयालयीन विदयार्थीनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे. तसचे अधिक माहिती करिता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय पंचायत समीती यांच्याशी संपर्क साधावे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here