The गडविश्व
गडचिरोली, १० ऑक्टोबर : संपूर्ण देशभरात “मेरी माटी, मेरा देश” आणि “अमृत कलश यात्रा” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील लोक कलावंतांच्या चमुने जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये जाऊन “मेरी माटी मेरा देश” आणि “अमृत कलश यात्रा” याविषयी जनजागृती केली .
१ सप्टेंबर ते ३० ऑक्टोंबर पर्यंत “मेरी माटी मेरा देश” आणि “अमृत कलश यात्रा” या अंतर्गत आपल्या हातामध्ये माती घेऊन तिची सेल्फी काढायची आणि ती सेल्फी yuva.gov.in वर अपलोड करायची आहे असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने गडचिरोली लोक कलावंत चमूनी समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला लावणी, कोळी लोकनृत्य , देशभक्ती गीत आणि रेला आदिवासी लोक नृत्य सादर करून महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या या कलांचे प्रदर्शन करून लोकांची पारंपरिक लोक कलेशी नाळ जोडली. सोबतच अभियानाबद्दल प्रत्येक जण माणसामध्ये समाज प्रबोधन करून राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रबळ केली.
“मेरी माटी मेरा देश” अमृत कलश यात्रा” मुळातच ही संकल्पना अतिशय गौरवशाली आहे. ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या मातीमध्ये आपण खेळलो, मोठे झालो, ज्या मातीत उगवलेलं आपण खातो, त्या मातीचे रक्षण करण्यासाठी कित्येक नरवीरांनी, शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाचा विसर पडू नये म्हणून हा अभियान संपूर्ण देशामध्ये राबवला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील लोक कलावंत चमू नी जबाबदारीची जाणीव ठेऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले. लोक कलावंत वैशाली कांबळे, मालनसूत अरुण, पुरुषोत्तम बुरडे, मनोज बुरडे, दिपक लाहोरी, कल्याणी शेडमाके, सोमप्रभु तांदुळकर, वंदीश नगराळे , महेश वाढई, उद्देश्य कामिडवार, रोहित लट्टेलवार, स्नेहा कौशिक, प्रणीत भारती, नंदिनी बोरडावार, अनुप बोलिवार, आदित्य मराठे, अनुराग लतेलवार, सोनाली बोरकुटे, ध्रुव शेडमाके, दिव्या भोयर, गीतिका खरवड़े, चेतना कोहचाड़े, अशोक नगराळे, बेबीलता खांडेकर , खोमेश बोबाटे, रुपेश चौधरी, सौरभ गेडाम, कृष्णाली पोटावी, कीर्ति जिगरवार, निखिल शेंडे या सर्व लोककलाकारांच्या उज्वल भवितव्यासाठी सुशिल खांडेकर, सचिव नालंदा लोक कला मंच बहु.संस्था, प्रणय मेडपल्लीवार,बराहुल हुके ,रोमा भैसारे यांनी सदिच्छ्या व्यक्त केल्या.