व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निलेश सातपुते यांची नियुक्ती

382

– निलेश सातपुते यांनी मानले आभार
The गडविश्व
गडचिरोली, १० एप्रिल : व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निलेश सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच याबाबतचे नियुक्तीपत्र व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांच्या सहिनीशी प्राप्त झाले आहे.
निलेश सातपुते हे मागील दोन वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत. तसेच ते लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक असून नवनविन उपक्रम हाती घेत डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुद्धा पत्रकार दिन कार्यक्रमातून केला. अशाच कार्याची दखल घेत व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, डिजीटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक महाराष्ट्र जयपाल गायकवाड यांनी विश्वास दर्शवत संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय धोरने पत्रकारांपर्यंत पोहचविण्यासाठी निलेश सातपुते यांची व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश सातपुते यांनी संघटनेच्या सर्वच मान्यवर, पदाधिकारी यांचे आभार मानले असून जिल्ह्यात संघटना बळकटीकरण व मजबूत करण्याकरिता संघटनेची ध्येय धोरणे जिल्ह्यातील डिजिटल मिडिया कार्यरत पत्रकारांपर्यंत पोहचविण्याचे काम करू असे आश्वस्त केले आहे. त्यांच्या निवडीने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The गडविश्व न्यूज तर्फे खूप खूप अभिनंदन💐💐

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli voice of media digital jilhadhyksy) (nilesh satpute)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here