The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३० : सामाजिक कार्यकर्ते तसेच आंधळी ग्रामपंचायतचे उपसरपंच, प्रहार संघटनेचे प्रमुख, दिव्यांग लोकांचे सेवक तसेच रुग्णमित्र यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत गडचिरोली सारख्या मागास व नक्षलग्रस्त क्षेत्रात कीतेक वर्षापासून दिव्यांग सेवक म्हणुन कार्यरत असलेले समाजसेवेचे व्रत जोपासत, सामाजिक कार्याची आवड तसेच गोर गरिबांसाठी न्याय, हक्क, अधिकारासाठी नेहमी तत्पर असणारे, माहिती तंत्रध्यामध्ये प्राविण्य असलेला, उच्च शिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी आपले जीवन झोकून देणारे, अन्याय अत्याचार होऊ नये याकरिता आजवर त्यांनी केलेले सामाजिक कार्य गुणवत्ता, संघटनात्मक आणि कार्यक्षमता, गरजू व्यक्तीना मदत, निस्वार्थ समाजसेवेचा परिचय व सामाजिक कार्याची दखल घेत माहितीचा अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या कुरखेडा तालुका अध्यक्ष पदी अप्रव पुरंदर भैसारे यांची शिफारस समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांनी समितीच्या राज्य कार्यकारणीकडे केली. त्यांच्या सामाजिक क्षेत्रात योगदान व समाजाच्या प्रति असलेले तळमळ पाहून या महत्त्वपूर्ण कुरखेडा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केल्याचे समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांनी सांगीतले.
महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या कुरखेडा तालुका अध्यक्ष पदी अप्रव पुरंदर भैसारे यांची नियुक्ती यांची केली आहे. त्यांना समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या नियुक्ति बद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.
