अनुष्का भोयर इयत्ता दहावीमध्ये प्रियदर्शनी विद्यालयातुन प्रथम

324

अनुष्का भोयर इयत्ता दहावीमध्ये प्रियदर्शनी विद्यालयातुन प्रथम
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २९ : स्थानिक प्रियदर्शनी विद्यालयातुन अनुष्का भोयर ह्या विद्यार्थ्यांनी ने इयत्ता दहावीमधे ७८ टक्के गुण घेऊन विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान मिळवित विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल ९८.७१ टक्के लागला आहे.
प्रियदर्शनी विद्यालयातुन अनुष्का भास्कर भोयर ह्या विद्यार्थिनींनी शाळेतून प्रथम आली, तिला ५०० पैकी ३९२ गुण मिळवित गुणांची टक्केवारी ७८.३३ टक्के येवढी आहे.
द्वितिय क्रमांकावर नकुल बालाजी राजगडे याने ५००पैकी ३८५ गुण मिळवित गुणांची टक्केवारी ७७.०० आहे. तृतियस्थानि युग कुमोद मशाखेत्री ५०० पैकी ३८४ गुण प्राप्त करीत ७६.८० टक्के, कु . रोहिणी गणेश मांदळे हिने ५०० पैकी ३७८ गुण मिळवित ७५.६० टक्के प्राप्त केले आहेत.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री लोखंडे, शिक्षिका सौ. गुरुनुले, सौ. राऊत, रामटेके व घोटेकर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक भास्कर भोयर सह आदिचे पुष्पगुच्छ व रोख पुरस्काराने सन्मानित करून विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sscresult2024 #10theresult2024 #dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here