– कारचा चेंदामेंदा
The गडविश्व
अहमदनगर, ०२ जुलै : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच. काल शनिवारी खासगी बसचा भीषण अपघात झाला यात २५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतांनाच आज रविवारी पुन्हा कारचा भीषण अपघात झाला यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे वाहन नांदेडहुन मुंबईकडे निघाली होती असे कळते.
समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ नांदेडहुन मुंबई ला जात असलेल्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. भरधाव वाहन रोडवरील दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. यात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला असून मृतकांची नावे अद्याप कळू शकली नाही. या भीषण अपघात वाहनाचा चेंदामेंदा झाला असून मोठे नुकसान झाले आहे.