अंकीत गोयल यांची गडचिरोली परीक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती

1167

– संदीप पाटील यांचे नागपूरला स्थानांतरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गडचिरोली नक्षलविरोधी अभियानाचे गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीने नागपूर येथे नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणुन पदोन्नती करण्यात आली असून त्यांच्या जागी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांची गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न मधील तरतुदींनुसार ४४ भा.पो.से./रा.पो.से. अधिकाऱ्यांची बदलीने/पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत असल्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्यावतीने ३१ जानेवारी रोजी परीपत्रक निर्गमित केले आहे.
अंकित गोयल हे यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली पोलीस दलात सेवा दिल्यानंतर त्यांची पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली होती. आता गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून त्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आल्याने पुन्हा गडचिरोली जिल्ह्याशी ते कनेक्ट होणार आहेत.

(thegdv, the gadvishva, gadchiroli news, ankit goyal, sandip patil, gadchiroli police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here