‘रेड अलर्ट’ : सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना २८ व २९ जुलै ला सुट्टी

1519

The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : मुसळधार पावसाने व हवामान विभागाने दर्शविलेल्या रेड अलर्ट ने जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना २८ व २९ जुलै ला जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
मागील ५ दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगीतम, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत आहे. तसेच सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहे तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैद्राबाद द्वारा आज २७ जुलै, २०२३ द्वारा प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील २४ तासाकरिता गडचिरोली/चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तेलंगाणा राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करुन मुसळधार पाऊसासह अत्याधिक पावसाची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये २८ जुलै, २०२३ व २९ जुलै, २०२३ रोजी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here