– सिनेमागृहमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
The गडविश्व
ब्रम्हपुरी, २२ एप्रिल : येथील एकमेव असलेल्या अलंकार सिनेमागृहाला आग लागून आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
ब्रम्हपुरी येथे आरमोरी मार्गावर एकमेव अलंकार सिनेमागृह आहे. गुरुवाच्या रात्री या सिनेमगृह
बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी सिनेमागृहाला दुसरा मार्ग नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आला. सिनेमागृहातील संपूर्ण साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. यात सिनेमागृह मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ब्रम्हपुरी परिसरात एकमेव सिनेमागृह असल्याने चित्रपट बघण्याकरिता परिसरातील नागरिकांची झुंबड उडत होती. वडसा,नागभीड, आरमोरी, कुरखेडा, कोरची परिसरारापासून नागरिक त्याठिकानी चित्रपट पहावयास जात होते. मात्र आता सिनेमागृहाला आग लागल्याने मात्र नागरिकांची हिरमोड झाली आहे.
(the gadvishva) (the gdv) (chandrapur bramhapuri alankar talkies alankar)