अहेरी पोलीसांनी देशी व विदेशी दारुसह ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

46

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : जिल्हा पोलिसांच्या वतीने अवैधरित्या दारू तस्करी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान अहेरी पोलिसांनी देशी व विदेशी दारुसह ९ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २ सप्टेंबर रोजी केली. याप्रकरणी देवाजी निला सिडाम (वय ३४), दिलीप रामा पोरतेट (वय २८), संपत पोच्चा आईलवार (वय ३८) सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणा­या धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये २ सप्टेंबर २०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना कोलपल्ली येथील वरील आरोपी हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण ९ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा निलकंठ पेंदाम, नापोअं हेमराज वाघाडे, पोअं शंकर दहीफळे, मपोअं राणी कुसनाके, चापोहवा दादाराव सिडाम यांनी पार पाडली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroliforest #crimenews #aheri )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here