The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या महिलांकडून प्रयत्न केले जात आहे. नुकतेच मुक्तिपथ व गाव संघटनेने गावातील दारूविक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेत पुन्हा अवैध व्यवसाय केल्यास पोलिस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अहेरी शहरालगत असलेले चेरपल्ली येथील मुक्तीपथ गाव संघटन महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसापूर्वी गावातील महिलांनी बैठक घेऊन गावात अवैधरित्या दारुविक्री करीत असलेल्या तब्बल 44 दारू विक्रेत्याकडून दारूबंदीचे हमीपत्र लिहून घेतले. सोबतच दारू विक्री चालू ठेवल्यास गाव संघटन व गावातील पोलीस पाटील यांच्या सहाय्याने दारू विक्रेत्यावर योग्य ती कार्यवाही करू असा इशारा सुद्धा विक्रेत्यांना दिला, यावेळी गावातील जवळपास 40 महिला, गावचे पोलीस पाटील, मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर, प्रेरक नंदिनी आशा उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)