– घोषवाक्यातून जनजागृती
The गडविश्व
गडचिरोली,११ डिसेंबर : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे मुक्तिपथ व उप पोलिस स्टेशनच्या संयुक्त विध्यमाने रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
सदर व्यसनमुक्त रॅलीमध्ये शासकीय आश्रम शाळा पेरमिली, पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, विविध बचत गटाचे महिला, गावांतील नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मुक्तीपथचे बॅनर घेऊन दारू व तंबाखूमुक्तीचे अनेक नारे देण्यात आले. ‘नशा करी, जीवनाची दुर्दशा’, ‘सोडून द्या, सोडून द्या, दारू सोडून द्या’, ‘नशा करी, जीवनाची दुर्दशा’, ‘ तंबाखू सोडा, कर्करोग हटवा’, ‘बंद करा, बंद करा गावांतील दारू बंद करा’, ‘तंबाखू सोडा, आरोग्य जोडा’ अशा घोषवाक्यातून जनजागृती करण्यात आली. गावातील विविध मार्गाने निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

(The Gadvisha) (Gadchiroli News Updates) (Muktipath)