The गडविश्व
ता.प्र /धानोरा, २६ जुलै : चातगाव नजीक धानोरा मार्गावर आज अचानक झालेल्या वादळी पावसाने रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याने चार चाकी, दुचाकी वाहनाच्या रहदारीला अडथळा निर्माण झालेला आहे .
चातगाव परिसरात आज २६ जुलै रोजी सकाळपासून पाऊस सुरू होता. परिसरात वादळी पाऊस झाल्याने झाडाचे मूळ मोकळे झाले असावेत ते यामुळे अचानक दुपारी ०३.०० ते ०३.३० वाजताच्या दरम्यान भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गाची वाहतूक बंद झालेली होती. झाड तोडेपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असल्याने रस्त्यावरती वाहनाचे रांगा लागलेल्या होत्या.