The गडविश्व
गडचिरोली, ३१ मार्च : मुलचेरा तालुक्यातील कालीनगर येथे दारू व तंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून दारूमुक्तीची मशाल पेटवून एकूण ४४ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
कालीनगर गावामध्ये अवैध दारूविक्री केली जाते. मात्र, दारूविक्री बंदीसाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते. परंतु, मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून गावात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून ग्रामस्थांना दारू व तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनतर गावातील एकूण ४४ जणांनी दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेत सहभाग दर्शविला. सोबतच गावामध्ये गाव संघटना गठीत करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी बिना हलदार, रिता ढाली, सुनीता पाईल, दीपिका हलदार, दीपमाला सरकार, बिना हलदार, अंजना बर, ग्रापं सदस्य मीना हलदार, चंपाराणी मंडल यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे व नम्रता मेश्राम यांनी केले.
