भरकटलेला जंगली हत्ती मृतावस्थेत आढळला

1497

-वनविभागात खळबळ, घातपाताची शक्यता ?
The गडविश्व
सिंदेवाही, ३ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातुन भरकटत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात प्रवेश केलेला जंगली हत्ती मृतावस्थेत आढळल्याची घटना आज ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने मात्र वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
ओडीसा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी या कळपातुन एक हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जंगल परिसरात भरकटला होता. अनेक दिवसांपासून हत्तीने धुमाकूळ माजवत अनेक शेतपिकांचे नुकसान केले होते. सिंदेवाही तालुक्यातील विविध भागात हा हत्ती भ्रमंती करीत होता अशी माहिती आहे.
दरम्यान आज ३ आक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका शेतशिवारात हा हत्ती मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सर्वत्र वन्यजीव सप्ताह राबविआ जातो. या दरम्यान विविध उपक्रम राबविले जातात मात्र याचक्षणी जंगली हत्ती मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली असून. हत्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही मात्र घातापताची शक्यताही वर्तविली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.

(chandrpur, sindevahi, wild elephant ded, forest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here