कुरखेडा येथे लाडक्या बहिणींनी औक्षण करीत बांधल्या पोलीस दादांना राखी

365

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २० : बहिन भावाचा प्रेम वृध्दिगत करणारा पर्व म्हणजेच रक्षाबंधन. या निमीत्य येथील लाडक्या बहिणीनी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे सोमवार १९ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता पोहचत पोलीस दादांना राखी बांधत त्यांचाकडून सुरक्षेची हमी घेतली.
पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात महिला भगिनीनी पारंपरिक पध्दतीने औक्षवंत व तिलक करीत मोठ्या आस्थेने उपस्थीत सर्व पोलीस बांधवाना राखी बांधल्या व त्यांच्या कडून शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखत महिला सूरक्षेची हमी घेतली यावेळी ठाणेदार महेन्द्र वाघ पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे पोलीस उपनिरीक्षक हिरामन गायकवाड़ तसेच भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली कावळे जिल्हा सचिव शितल लांजेवार सहसचिव रंजू मेश्राम,शोभा दहिकर,रेखा रामटेके, किर्ति बगमारे,शोभा दहिकर,वच्छला कसारे,पूष्पा सोरते, संगीता मडावी,आशा जांभूळकर तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here