चकमकीत एका महिला नक्षलीसह दोन जवान जखमी ; मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

2179

– महिला नक्षलीवर १ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
कांकेर, २८ मे : परतापुर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या उरपांजूर (पटेलपारा) नजीकच्या जंगल परिसरात  २६ मे रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एक महिला नक्षलीसह दोन जवान जखमी झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्यही जप्त करण्यात आले आहेत.
२६ मे रोजी ४७ वी कॉर्प्स बीएसएफ कॅम्प संगम, मारोरा, १३२ वी बीएसएफ कॅम्प छोटेबेठिया, १७८ वी कॉर्प्स बीएसएफ कॅम्प बडेझरकट्टा, मंडगाव, मेंद्रा येथून BSF + DEF ची संयुक्त पथक पाखंजूर, छोटेबेठिया, बांडे, बारगाव, दुर्गकोंडल, परतापूर या पोलीस ठाण्यांतर्गत भुरका, टेकामेटा, जावेली, उरपंजूर, मरकचुआ आणि त्याच्या आसपासच्या भागात गावांमध्ये नक्षलविरोधी अभियान राबवित होते दरम्यान BSF + DEF संयुक्त पथक रात्रो ८ वाजता कॅम्प मेंद्रा येथून निघाले असता परतापूर पोलीस स्टेशन अंतर्गत उरपंजूर (पटेलपारा) गावाजवळ पोलीस नक्षल चकमक उडाली. चकमकीत सुरक्षा दलांची संख्या जास्त असल्याचे पाहून नक्षली जंगल व डोंगराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी शोध घेतला असता ०१ महिला नक्षली गोळी लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिची ओळख आर.के.बी. मदनवाडा-कोडेकुर्से या विभागांतर्गत कोटरी क्षेत्र समितीचे संयुक्त LOS सदस्य म्हणून फगनी पोडियामी असे असून तिचा पती विनोद गावडे असल्याचे कळते. जखमी महिला नक्षलीवर ०१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहे.
घटनास्थळावरील शोधमोहीम राबविली असता सिंगल शॉट रायफल ०१ नग, सिंगल शॉट राउण्ड ०७ नग, ७.१ एमएम राउण्ड २३ नग, ८ एमएम राउण्ड १५ नग, १२ बोर राउण्ड ०६ नग, प्रेशर कुकर आईईडी ०६ नग, सोलर प्लेट ०१ नग, इलेक्ट्रिक वायर ०३ बंडल, रिमोट कन्ट्रोल  ०७ नग, टार्च ०२ नग, छोटा बेटरी ०८ नग, नक्षली पोशाख,पोच, पिट्ठु, साहित्य/पर्चा तसेच मोठ्या प्रमाणात औषधी व दैनंदिन उपयोगात येणारे साहित्य जप्त करण्यात आली. ©©© (टीप : बातमी स्वमनाने लिहिता येत नसेल तर कॉपी पेस्ट जशीच्या तशी करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here