-तीन जवान जखमी,परिसरात शोधमोहीम सुरूच, शस्त्रे व साहित्य केले जप्त
The गडविश्व
कांकेर, दि. १६ : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून या दरम्यान नक्षली डोके वर काढतांना दिसत आहे. अशातच आज १६ एप्रिल ला पोलीस नक्षल चकमकीत तब्बल १८ नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील कांकेरच्या छोटेबेठिया ठाण्याअंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. सुमारे एक तास चाललेल्या या चकमकीत तब्बल १८ नक्षली ठार तर ३ जवान जखमी झाल्याची माहिती आहे. चकमकीनंतर घटनस्थळावरून Ak47 व इतर स्वयंचलित हत्यार जप्त करण्यात आले आहे. चकमकीत ठार झालेल्या नक्षलीमध्ये डीव्हीसी दर्जाचे शंकर राव आणि ललिता मडवी यांचा समावेश आहे . या दोघांवर २५-२५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते अशीही माहिती आहे. आतातापर्यंतची ही मोठी कारवाई मानल्या जात आहे. तसेच ठार नक्षल्यांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#WATCH | "Bodies of 18 naxals recovered from encounter site in Chhotebethiya of Kanker. 3 jawans were injured in the operation. Search operation underway. This can be seen as one of the biggest anti-naxal operations in the area. The operation was launched after information of the… pic.twitter.com/mI0IuW8KfI
— ANI (@ANI) April 16, 2024
(#thegdv #thegadvishva #kanker #naxal #cgnews )