गडचिरोली : १०४ वर्षीय महिलेने बजावला मतदानाचा हक्क

675

– जिल्ह्यात अंदाजित ७६.१८ टक्के मतदान
The गडविश्व
गडचिरोली, १८ डिसेंबर : जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी आज रविवार १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान पार पडले.
दरम्यान कुरखेडा तालुक्यातील १०४ वर्षीय वृद्ध महिलेने मतदानाचा अधिकार बजावून ‘प्रत्येकाने मतदानाचा हक्क बाजावावा’ असा आदर्श पुढे ठेवला आहे. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानास सुरुवात झाली व ३.०० वाजतापर्यंत शांततेत मतदान पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यातील मतदान पार पडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कुरखेडा तालुक्यातील २, देसाईगंज तालुक्यातील १, आरमोरी तालुक्यातील २, गडचिरोली तालुक्यातील २, धानोरा तालुक्यातील ३, चामोर्शी ४, अहेरी ३, एटापल्ली १ व सिरोंचा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतचा समावेश होता.
कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील कासाबाई जंगली झोडे या १०४ वर्षीय महिलेने मतदानाचा हक्क बजावत मतदारांपुढे एक आदर्श निर्माण करून प्रत्येकांनी मतदान करावे, आपले अमूल्य मत वाया जावू देऊ नये असा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे कासाबाई यांची ही चौथी पिढी आहे.

प्रशासनाद्वारे प्राप्त झालेली अंदाजे मतदान टक्केवारी

जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाची प्रश्नाद्वारे अंदाजीत टक्केवारी प्राप्त झाली असून एकंदरीत ७६.१८ टक्के मतदान झाल्याचे कळते.
तर तालुका नुसार बघितले तर कुरखेडा ८२.४७ टक्के, देसाईगंज ७७.५१ टक्के, आरमोरी ८२.३२ टक्के, गडचिरोली ८२.७७ टक्के, धानोरा ७१.४२ टक्के, चामोर्शी ८२.२० टक्के, अहेरी ७९.१७ टक्के, एटापल्ली ६७.१३ टक्के, सिरोंचा ७०.५८ टक्के अंदाजीत मतदान झाले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Grampanchayat Voting) (Argentina vs France) (Puneri Paltan) ( Mr. Olympia 2022) (Lusail Stadium) (Wayne Rooney) (A 104-year-old woman exercised her right to vote In Gadchiroli District)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here