गडचिरोलीत डाटा ऑपरेटर पदासाठी भरती; २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

2

गडचिरोलीत डाटा ऑपरेटर पदासाठी भरती; २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना संधी; पदवीधरांसह गोंडी भाषेचे ज्ञान आवश्यक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मानधन तत्त्वावर डाटा ऑपरेटर पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सुशिक्षित अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही नियुक्ती दहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे.
या पदासाठी उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक आहे. तसेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र, इंग्रजी टायपिंगचा वेग ४० शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टायपिंगचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट असल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. याशिवाय उमेदवाराला गोंडी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
दरम्यान, सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
उमेदवार गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक असून, गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, चामोर्शी, धानोरा आणि वडसा या तालुक्यांतील पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

२७ नोव्हेंबर अंतिम मुदत

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कॉम्प्लेक्स एरिया, एलआयसी कार्यालयाजवळ, गडचिरोली येथे प्रत्यक्ष सादर करावेत.
या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र अनुसूचित जमातीतील उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अरुण एम., सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here