कुरखेड्यात रक्तदान जनजागृतीसाठी निरंकारी स्वयंसेवकांची रॅली

5

कुरखेड्यात रक्तदान जनजागृतीसाठी निरंकारी स्वयंसेवकांची रॅली
– २० नोव्हेंबरला महा रक्तदान शिबिर; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १८ : रक्तदान हेच मानवसेवेचे श्रेष्ठ कार्य असल्याचा संदेश देत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या कुरखेडा शाखेच्या वतीने मंगळवारी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. येत्या २० नोव्हेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, कुरखेडा येथे आयोजित महा रक्तदान शिबिराच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली.
संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी रक्त गटारात वाहण्यापेक्षा मानवसेवेसाठी दान व्हावे, असा मोलाचा संदेश दिला होता. त्यांचे मानवतावादी विचार पुढे नेत निरंकारी स्वयंसेवकांकडून दरवर्षी देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
कुरखेडा शाखेच्या वतीने मागील १४ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. यंदाही आयोजित शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
या रॅलीत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे कुरखेडा शाखाप्रमुख माधवदास निरंकारी, सेवादल शिक्षक अजय पुस्तोडे, संचालक दिलीप निरंकारी यांच्यासह बंटी देवढगले, रामदास मरापे, संदीप मेश्राम, रोहित खडाधार, गोलू पुस्तोडे, गुरू दुर्गपूजारी, कुमार प्रधान, निखिल राऊत, विनोद माकडे तसेच बाल सेवादलाचे मंथन निरंकारी, वैद पुस्तोडे आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #BloodDonation #BloodDonationCamp #NirankariMission #Kur Kheda #Humanity #SocialService #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here