समान काम, समान वेतनासाठी धानोरा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

5

समान काम, समान वेतनासाठी धानोरा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
– वकील संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा; न्यायालयीन कामकाजावर परिणाम
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १८ : समान काम, समान वेतन या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी धानोरा येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असून, वकील संघटनेनेही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समान कामासाठी समान वेतन लागू करण्याची मागणी कर्मचारी करीत आहेत. कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या समान असतानाही वेतनाच्या बाबतीत सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनात सहाय्यक अधीक्षक एम. एम. वासेकर, वरिष्ठ लिपिक के. एन. तपासे, एम. व्ही. चहांदे, ये. डी. गुरुनुले, सी. जी. बर्लिवार, एच. एम. ठाकरे, आर. जी. ढोले, एम. व्ही. माणुसमारे, बी. डब्ल्यू. कोरडे, पी. जे. धंदरे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, वकील संघटनेचे ॲड. गजानन दुगा यांच्यासह इतर वकिलांनी या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here