गडचिरोली : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

8

गडचिरोली : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : पावसाच्या अनियमिततेमुळे धानपीक करपले, तर दुसरीकडे डोक्यावरील कर्जाचा भार वाढत गेला. या आर्थिक विवंचनेतून चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील ३६ वर्षीय शेतकरी सचिन भाऊजी सातपुते यांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा पावसाअभावी सचिन सातपुते यांच्या शेतातील धानपिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळली होती. सोसायटी, बचत गट आणि बँकेचे मिळून त्यांच्यावर अडीच ते तीन लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेतून त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

या घटनेने भेंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. चामोर्शी पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chamorshinews #Gadchiroli #Chamorshi #FarmerCrisis #CropLoss #FarmerDebt #MaharashtraNews #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here