गुरनोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीची जोरदार धडक; दोन युवक गंभीर

31

गुरनोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीची जोरदार धडक; दोन युवक गंभीर
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०३ : शेतातून धान भरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावाजवळील पुलानजीक घडली.

आकाश सदाशिव कोडवते (३५) आणि श्रीहरी टिकाराम पेंदाम (२२), दोघेही रा. गुरनोली, अशी जखमींची नावे आहेत. दोघेही काही कामानिमित्त गेवर्धा येथे गेले होते. ते एमएच ३५ एटी २००१ क्रमांकाच्या दुचाकीने गुरनोलीकडे परत येत असताना शेतातून धान भरून रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या इंजिनला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने दोघांनाही कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. आकाश कोडवते यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून श्रीहरी पेंदाम यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. दोघांचीही प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्याकरिता सहकार्य केले. घटनेमुळे गुरनोली परिसरात चिंता व्यक्त होत आहे. #thegdv #thegadvishva #crimenews #accident #kurkhedanews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here