गडचिरोलीत १.२० कोटींच्या अंमली पदार्थासह आठ जणांना अटक

3

गडचिरोलीत १.२० कोटींच्या अंमली पदार्थासह आठ जणांना अटक
– तीन वाहने आणि आठ मोबाईलसह १.४६ कोटींचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना गडचिरोली पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत ताब्यात घेतले. या कारवाईत २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थासह एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यातील तिघे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी पायलटिंग करत असल्याचे समोर आले. त्यांच्या माहितीवरून पिकअपमधून अंमली पदार्थ घेऊन येणारे तिघे आणि खरेदीसाठी थांबलेले बीड जिल्ह्यातील दोघे अशा आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींकडून १ कोटी २० लाख २९ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ, तीन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उपपोलीस ठाणे पेंढरी येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) यांच्या संयुक्त पथकाने केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here