गडचिरोली-आरमोरी मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

3

गडचिरोली-आरमोरी मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील गोगावजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भूषण कोमलदास शेंडे (२९, रा. गोगाव, ता. जि. गडचिरोली) असे मृताचे नाव आहे. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, भूषण शेंडे हा दुचाकीने (एमएच ३४ बीके ८६३९) गडचिरोलीहून आरमोरी मार्गे गोगावकडे जात होता. दरम्यान, आरमोरीकडून येणाऱ्या ट्रकने (एमएच २८ बीबी ७६२४) त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात भूषण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याप्रकरणी किशोर वासुदेव मांडवगडे (३६, रा. गोगाव) यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून ट्रकचालक नितीन श्रीराम साबे (४६, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामराव पाटील पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here