‘उदितउत्सव’ संस्कृती, शिस्त आणि यशाचा गौरव ; लॉईड्स राज विद्यानिकेतनचा वार्षिक दिन उत्साहात

24

‘उदितउत्सव’ संस्कृती, शिस्त आणि यशाचा गौरव ; लॉईड्स राज विद्यानिकेतनचा वार्षिक दिन उत्साहात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : लॉईड्स राज विद्यानिकेतन (LRVN) चा वार्षिक दिन ‘उदितउत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण, शिस्त आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे दर्शन घडवणारा ठरला.
कार्यक्रमास LRVN चे अध्यक्ष बी. प्रभाकरन, LIF च्या संचालक सुश्री कीर्ती रेड्डी यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. श्रीमती सुनीता मेहता, नितीन चौधरी आणि श्रीमती अर्चना जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व गणेशवंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना जोशी यांनी शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचा आढावा घेत ‘Mimamsa’ संस्थेकडून LRVN ला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा म्हणून मिळालेल्या गौरवाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी ‘स्कूल रिपोर्ट’ सादर करत वर्षभरातील उपक्रम मांडले. ‘भारत एक खोज’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. पुरस्कार वितरणात विविध स्तरांवर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे बी. प्रभाकरन यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पालक व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here