कुरखेडा : चारचाकी वाहन पलटून अपघात, सहा जण जखमी

106

कुरखेडा : चारचाकी वाहन पलटून अपघात, सहा जण जखमी
– दोघांची प्रकृती गंभीर
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १३ : तालुक्यातील बामणी गावाजवळ आज सकाळी चारचाकी वाहन पलटी झाल्याने या भीषण अपघात सहा जण जखमी झाले. कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी निघालेली ही गाडी अचानक समोरील चाक (टायर) फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी झाली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात जखमी झालेल्यांपैकी राजेश हलामी व आनंद हलामी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर भास्कर हलामी, रोशन हलामी, करण मडावी आणि सुमित कोल्हे हे इतर चौघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, बातमी लिहेपर्यंत या घटनेची अधिकृत माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहन चालवण्यापूर्वी टायरची स्थिती तपासणे, तसेच वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #accident #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here