धानोरा येथे कोतवालांचे धरणे आंदोलन

55

धानोरा येथे कोतवालांचे धरणे आंदोलन
– चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणीसाठी तहसीलदारांना निवेदन
The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि. ११ : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी मिळावी या मुख्य मागणीसाठी कोतवालांनी धानोरा येथे धरणे आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन सादर केले.
कोतवाल म्हणजेच महसूल सेवक हा महसूल विभागाचा कणा असून शासनाच्या विविध योजना, मोहिमा, जनगणना, निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन, प्रमाणपत्रे वाटप यासह ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय कामकाजात महत्वाची भूमिका बजावतो. अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडूनही कोतवालांना तुटपुंज्या मानधनावर २४ तास काम करावे लागत असून त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.
शासनाने यापूर्वी कोतवालांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे संघटनेने राज्यव्यापी आंदोलन छेडले असून त्यानुसार १० सप्टेंबर रोजी काळी फीत लावून काम, ११ सप्टेंबर रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन आणि १२ सप्टेंबर रोजी महसूल मंत्री कार्यालयात साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
धानोरा येथील धरणे आंदोलनात तालुका अध्यक्ष आशिष पोरेटी, उपाध्यक्ष यशपाल टेम्भूरने, सचिव महेश वलादे यांच्यासह तालुक्यातील सर्व कोतवाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here