– गडचिरोली जिल्हा वर्धापनदिनानिमित्त दिल्या यांच्या शुभेच्छा!
The गडविश्व
मुंबई, दि. २६ : गडचिरोली जिल्हा स्थापनादिनाच्या ल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या असून, गडचिरोलीला विकासाच्या शर्यतीत अग्रणी बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
“गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नव्हे, तर पहिला जिल्हा आहे. त्याला उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज करत विकासातील अग्रणी जिल्हा बनवू,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त फडणवीस यांनी विकासप्रवासाचा आढावा घेत सांगितले की, “2014 पासून गडचिरोलीला विकासाच्या केंद्रस्थानी आणले. आज अर्धा जिल्हा माओवादमुक्त झाला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत देश माओवादमुक्त करण्याचा जो निर्धार केला आहे, त्यादिशेने राज्य कार्यरत आहे. यामध्ये गडचिरोली पोलिस आणि सी-60 जवानांचे योगदान मोठे आहे. दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमांनी पोलिस विकासाचे अग्रदूत ठरले आहेत.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “गडचिरोलीला पोलाद सिटी बनविण्याचे काम सुरू असून तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक येथे होत आहे. मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्ते, शिक्षण सुविधा यामुळे गडचिरोलीचा विकास वेगाने होत आहे. जल, जमीन, जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करतच प्रगती साधली जाईल,” असे ते म्हणाले.
“गडचिरोलीच्या नागरिकांच्या भक्कम साथीमुळे ही विकासयात्रा गतिमान झाली आहे. सर्व जिल्हावासियांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला संदेश दिला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













