– गेवरा बुजमध्ये युवकाची दुःखद आत्महत्या
The गडविश्व
सावली, दि. ३० : “मी आत्महत्या करणार” असे पूर्वीच सांगून एका युवकाने अखेर गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना सावली तालुक्यातील गेवरा बुज येथे मंगळवार २९ जुलै रोजी उघडकीस आली. प्रशांत विठ्ठल चौधरी (वय ३२) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
प्रशांतने काही दिवसांपूर्वीच नातेवाईकांना आत्महत्येचा इशारा दिला होता. मात्र त्याच्या दारूच्या व्यसनामुळे कुणीही त्याच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सोमवारी (दि. २८) त्याने आत्महत्येचा विचार सोडावा म्हणून कुटुंबियांनी समजूत काढली. मात्र, मंगळवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संधी साधून त्याने बकरीपालन शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर, मडावी, कोरे, गायकवाड, खंडाळे, शेंडे, बारेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chandrpurnews #SuicideCase #MentalHealthAwareness #YouthSuicide #GevraBuj #AlcoholAddiction #EmotionalDistress #RuralNews #GadchiroliNews #PoliceInvestigation #TragicIncident #FamilyLoss #SuicideAwareness #MentalWellness #StopSuicide #CommunitySupport #आत्महत्या #सावलीघटना #गेवराबुज #मानसिकआरोग्य #भावनिकअस्थिरता #दारूचेव्यसन #समाजजागरूकता #पोलीसकारवाई #गडचिरोलीवृत्त #युवकआत्महत्या #कौटुंबिकदुःख #मानसिकस्वास्थ्य #गावघडामोडी #शोकांतिका #जीवनमूल्य
