मुरूमगाव परिसरात रानटी हत्तीचा कहर ; घर उद्ध्वस्त, धानपिकांची नासधूस

303

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील मुरूमगाव परिसरात रानटी हत्तीच्या उपद्रवाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री (२४ जुलै) मुरूमगावपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड महामार्गालगतच्या शेतशिवरात (कंपार्टमेंट क्र. ६८५/६८७) एका रानटी हत्तीने थैमान घातले.
शेतकरी देवेंद्र अमरसिंग भुरकुरिया यांच्या सर्वे नं. ८४/८७/२, चरविदंड (रामपूर) येथील शेतशिवरात हत्तीने घुसून त्यांचे शेतातील घर उद्ध्वस्त केले. सुदैवाने दीपपूजेनिमित्त कुटुंब मुरूमगाव येथे गेल्याने जीवितहानी टळली. मात्र, घरातील साठवलेले एक क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल बियाण्याचे धान विखुरले गेले. केळीच्या बागेचीही मोठी हानी झाली.
याच हत्तीने परतीच्या मार्गावर मनोहर देवलसिंग भुरकुरिया, कृपाराम जयराम भुरकुरिया व विष्णुराम जगदेव संगोडीया यांच्या शेतांमध्ये घुसून धानपिकाचे मोठे नुकसान केले.
या घटनेनंतर शेतकऱ्यांनी पूर्व वनविभाग, मुरूमगाव येथे तक्रार दाखल केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विजय के. कोडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विलास समर्थ व वनरक्षक मनोज आर. कोवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत आश्वासन दिले.
दरम्यान, कळपापासून भटकलेल्या या रानटी हत्तीचा वावर सध्या मुरूमगाव परिसरात वाढला असून धान रोवणीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #ElephantRampage #CropDamage #WildElephantAttack #GadchiroliNews #FarmerLoss #ForestDepartmentAction #MurumgaonIncident #RuralDistress #PaddyFieldDamage #CompensationDemand
#हत्तीउपद्रव #गडचिरोलीवनविभाग #शेतीनुकसान #रानटीहत्ती #मुरूमगावघटना #धानपिकहानी #वनविभागपंचनामा #शेतकरीआक्रोश #गडचिरोली बातमी #ग्रामिणघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here