The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या (HSC) बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या, सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन स्वरूपात जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेला राज्यभरातील लाखो विद्यार्थी सामोरे गेले होते. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार असून, सर्व विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून निकाल पाहू शकतील.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे :
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
वरील संकेतस्थळांवरून विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहता येणार असून, त्याची प्रिंट आउट घेण्याची सोयही उपलब्ध आहे. यासोबतच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल स्वरूपातील गुणपत्रिका साठवता येणार आहे.
कॉलेज स्तरावर निकाल :
कनिष्ठ महाविद्यालयांना https://mahahsscboard.in (कॉलेज लॉगइन) या संकेतस्थळावरून एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा झाली होती : पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागांत फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवर वेळेत लॉगइन करून निकाल पाहावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केलं आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #HSCResult2025 #12thResult2025
#MaharashtraBoard #BaraviPariksha #MSBSHSE #HSCBoardResult #MahaHSC2025 #BoardExamResult #StudentsUpdate #ResultDay2025