गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई : ६१.७७ लाखांचा अवैध दारू साठा नष्ट

112

The गडविश्व
गडचिरोली, दि.२८ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू वाहतूक आणि विक्री होत असल्याचे आढळून आले असून, त्यावर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार पोस्टे देसाईगंज पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल ६१,७७,३३० रुपयांचा दारू साठा २८ मार्च रोजी नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २०१८ ते २०२४ या कालावधीतील ५२० गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला दारूचा साठा जागेअभावी आणि तो नाशवंत असल्याने २८ मार्च रोजी नष्ट करण्यात आला.
पोस्टे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु. के. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर जप्त मुद्देमाल नष्ट करण्यात आला. विदेशी आणि देशी दारूच्या हजारो बाटल्या तसेच बिअरच्या बाटल्यांचा समावेश असलेल्या या मुद्देमालाचा JCB आणि रोड रोलरच्या सहाय्याने चुराडा करण्यात आला. विशेष म्हणजे, पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोनि. अजय जगताप, सपोनि. प्रेमकुमार दांडेकर आणि त्यांच्या टीमने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या कठोर कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

#गडचिरोली #पोलीसकारवाई #अवैधदारू #दारूबंदी #गडचिरोलीपोलीस #CrimeNews #MaharashtraNews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here