– चंद्रपुरात उपचार सुरु
The गडविश्व
गडचिरोली,दि ०७ : गडचिरोली वनविभागातील चातगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील शेतशिवारामध्ये ६ फेब्रुवारी रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी (चातगांव) व आरआरटी टिम यांना वाघ जखमी अवस्थेत आढळला.
सदर घटनेची तात्क्ळ वरीष्ठ कार्यालयास सुचना देण्यात आली असून वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार रात्रभर वाघावार निगरानी ठेवण्यात आली. एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेनुसार व वरीष्ठांच्या आदेशानुसार वाघास उपचाराकरीता ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जेरबंद करण्यात आले व उपचाराकरीता चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. वाघाच्या जखमांची कारणमिमांसा पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपुर येथे तपासणी झाल्यानंतर अहवाल समोर येईल.
सदर घटनेचा तपास सुनिल सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी चातगांव व त्यांचे कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक गडचिरोली शैलेश मिना व अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) चातगांव व आरआरटी टिम, नवेगांव नागझिरा स्थित साकोली यांचे उपस्थितीत कार्यवाही पार पडली, असे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी कळविले आहे.
