खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

56

– लोकसभा क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना घेऊन चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी  केंद्रीय सडक परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली व गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.
दरम्यान  खासदार डॉ. किरसान यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची ते बोटेकसा, छत्तीसगड सिमेपर्यंत १८ कि. मी. राज्य महामार्ग क्र. ३१४, व चामोर्शी ते मुल एकूण २८ कि. मी. राज्य महामार्ग क्र. ३७८ चे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नत करण्याबाबत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले.
तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगांव ते सालेकसा या राज्य महामार्ग क्र. ३३५ साखळी क्र. २३८/२०५ बाघनदी वरील कमकुवत पुलाचे ठिकाणी सी. आर. एफ. निधी अंतर्गत नवीन पुलाचे बांधकाम करने, गडचिरोली ते आरमोरी, आस्टी -आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देऊन तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी केली. दरम्यान मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here