कुरखेडा : पात्र लाभार्थ्यांना डावलून प्रतीक्षा यादीतील मर्जीच्या लोकांना घरकुलाचा लाभ

210

– पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०१ : प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना डावलून प्रतीक्षा यादीतील मार्जीच्या लोकांना लाभ दिल्याचा गंभीर आरोप चिखली येथील नागरिकांनी पत्रपरिषदेत केला आहे.
कुरखेडा येथे आयोजित पत्र परिषदेत आपल्यावर कश्याप्रकारे अन्याय केला जात आहे याची माहिती दिली. या प्रसंगी चिखली येथील प्रल्हाद केशव लिल्हारे, महेश लालचंद बीनोट, मन्नालाल केजुलाल मोहारे, नयेन दास हिरादास डहाळे, जमनाबाई जीवन बहेटवार यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत समिती कुरखेडा येथील आवास योजनेचे काम पाहणाऱ्या कंत्राटी अभियंता व विस्तार अधिकारी यांनी पात्र यादीतील लाभार्थ्यांना डावलून प्रस्ताव सादर नसलेल्या व करारनामा नकेलेल्या लाभार्थ्यांना परस्पर प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता खात्यात टाकला असल्याचा आरोप केलेला आहे.
चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत चिखली येथील सूचना फलकावर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत नाव असलेल्या चिखली येथील ५ ही ग्रामस्थांनी नियमाप्रमाणे विहित नमुन्यात करारनामा सादर केला. आवास योजनेचा पहिला हप्ता जमा होताच गावातील इतर लाभार्थ्यानी बांधकाम सुरुवात केले. आपण सुद्धा इतर ग्रामस्थांसोबत करारनामा केला असता आपल्या खात्यात पैसे का आले नाही याची विचारणा करण्यासाठी पंचायत समिती कुरखेडा येथे आवास योजनेतील अभियंता कराडे यांना भेटले असता त्यांचे नाव यादीत नसल्याचे लक्षात आले. पात्र यादीत नाव असूनही लाभ मिळत नसल्याने या लाभार्थ्यांनी चिखली येथील आवास योजनेचा पहिला हप्ता दिलेल्या यादीचे अवलोकन केले असता असे लक्षात आले की पात्र यादीतील लाभार्थ्यांना डावलून ग्रामपंचायतच्या मर्जीतील उपसरपंच वासुदेव केजू बहेटवार, हर्षा होनाजी प्रधान अंगणवाडी सेविका, बायाबाई नोनाराम नागपुरे, हंसराज कन्हैया रक्षे, किशन जितलाल रक्षे यांचे पत्रता यादीत नाव नसतांना व करारनामे नसतांना ही यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत. तसेच मन्नालाल केजुलाल मोहारे यांचे पात्र यादीत नाव असतांना त्यांचे पैसे परस्पर त्यांचे बंधू मन्नुलाल काजूलाल मोहारे यांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे मन्नुलाल काजूलाल मोहारे यांनी प्रधान मंत्री आवास योजनेत अर्जच केलेला नाही. त्यांना मोदी आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे. ग्रामसभेने मंजूर केलेली यादी डावलून मर्जीतील लोकांना लाभ देवून पात्र लोकांना डावलण्याचा काम करणाऱ्या जबाबदार लोकांवर कडक कार्यवाही करावी तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here