कुरखेडा : बाल हक्क सप्ताह निमित्त बालहक्क आणि बालकांचे संरक्षणा विषयी जनजागृती आणि संवेदनशीलता कार्यक्रम संपन्न

224

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २७ : बाल हक्क सप्ताह, संविधान दिन आणि जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवाडा निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आंधळी येथे बालहक्क आणि बालकांच्या संरक्षण विषयावर जाणीवजागृती आणि संवेदनशीलता कार्यकर्माचे आयोजन “आम्ही आमच्या आरोग्यासाठी”, “मीराकल फाउंडेशन इंडिया “, आणि महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग, जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी” या कार्यक्रम अंतर्गत २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा, आंधळी, नवरगाव, बेलगाव, आणि खैरी तसेच या गावातील ग्राम बाल संरक्षण समिती, पोलीस पाटील आणि तंटामुक्त समिती सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्ताविका वाचन करून करण्यात आली. या कार्यक्रमात बाल संरक्षणाच्या दृष्टीने POCSO कायदा, बालविवाह प्रतिबंध, मनोधैर्य योजना, बालकांची काळजी व संरक्षण, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श, स्त्रियांवरील हिंसाचार आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालकांचे पथनाट्य,घोष वाक्य आणि पोस्टर प्रदर्शनीच्या माध्यमातून माहीती देण्यात आली. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक अविनाश गुरनुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, गडचिरोली यांनी POCSO या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक बालकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही शासनाबरोबर पालक आणि गावातील प्रत्येक व्यक्तीची आहे. आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील प्रयेक बालकाचे संरक्षण करावे. तसेच ते कोणत्याही परिस्थिती मध्ये बालकावर अन्याय करणार नाही आणि होईऊ देणार नाही असे त्यांनी जनतेलाआवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मनवर, बाल कल्याण समिती, जिल्हा गडचिरोली यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदावर प्रकाश टाकला. त्यांनी बालविवाहाचे मुलींवर होणारे विपरीत परिणाम, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न, त्यामागील सामाजिक मानसिकता यावर भाष्य करीत पालकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या मुलींना शिकू द्यावे, कमी वयात मुलींचे लग्न करू नये. मुलगी शिकेल तर तिचा सर्वांगीण विकास शक्य आहे. ती स्वावलंबी जीवन जगू शकते. सी. एन. जनबंधू अधिवक्ता तालुका विधी सेवा प्राधिकरण, कुरखेडा यांनी मनोधैर्य योजना विषयी माहिती दिली. प्रियंका आगाऊ, सहा. पोलीस निरीक्षक, कुरखेडा यांनी बालक, महिला आणि वृद्ध यांच्यावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध असलेल्या कायद्याची माहिती दिली.
श्रीमती विजयालक्ष्मी वघारे यांनी जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा अंतर्गत नकोच पळवाट महिला हिंसा मुक्तीसाठी! एकजूट होऊया महिला सन्मानासाठी” या अभियान विषयी बोलताना म्हणल्या कि, महिलांवर होणाऱ्या हिंसा थांबविण्यासाठी गावागावामध्ये जाणीव जागृती करणे गरजेचे आहे. आपण महिलाचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेचा विरोध केला पाहिजे. त्यांना सन्मानाची वागणूक दिली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुब सक्षम होईल. तर आपण महिलांचे सन्मान करुया.
या कार्यक्रमामध्ये आंधळी, नवरगाव तसेच कोरची तालुक्यातील झेंडेपार आणि साल्हे या गावातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केला. नवरगाव येथील मुलींच्या टीमने मुलींवर होणार्‍या हिंसेवर नाट्य सादर केले. सोबतच आंधळी ग्रामवासियांनी बाल विवाह होऊ देणार नाही तसेच त्यामध्ये सहभाग घेणार नाही आणि एक सुजाण नागरिक म्हणून सर्वांना बालविवाह ला कुठेच थारा देणार नाही यावर कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पोस्टर्स व घोषणा यामधून बालकांचे हक्क, संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी श्रीमती वर्षा मनवर, अध्यक्षा, बाल कल्याण समिती, अविनाश गुरनुले, जिल्हा बाल कल्याण अधिकारी, कवेश्वर लेनगुरे, बाल संरक्षण अधिकारी, जयंत जथाडे सामाजिक कार्यकर्ता, निलेश देशमुख, क्षेत्र कार्यकर्ता, रितेश थमके, चाईल्ड लाईन, श्रीमती प्रियंका आगाऊ, सहायक पोलीस अधिकारी, कुरखेडा, मुकेश शेंडे, संचालक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा, सैदूल टेकाम,कार्यक्रम व्यवस्थापक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, नानाजी खुणे, ग्रा.पं.सदस्य, आंधळी, प्रकाश जनबंधू, पोलीस पाटील, आंधळी, श्रीमती संघमित्रा कराडे, तंटामुक्त समिती, आंधळी, गिरीधर शहारे, शाळा व्यवस्थापन समिती, आंधळी, लाडे सर, मुख्याध्यापक, जी. प. उच्च प्राथमिक शाळा, आंधळी, तसेच आंधळी, नवरगाव, बेलगाव, खैरी येथील बालके, महिला वर्ग, ग्रामबाल संरक्षण समिती सदस्य, पालक, ग्रामपंचतचे कर्मचारी, जिल्हयातील बाल संरक्षण यंत्रणाचे कर्मचारी या जनजागृती कार्यक्रमात सहभागी होते.
कार्यक्रमाचे संचालन दिपाली कन्नाके यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना निकीता मते यांनी तर आभार अप्रव भैसारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश लाडे, माया कोचे, गावातील सर्व गावकरी, पदाधिकारी आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here