कुरखेडा शहरात संत निरंकारी मंडळाची जनजागरण रैली, रक्तदानासाठी केले आवाहन

167

कुरखेडा : संत निरंकारी मंडळाची शहरात जनजागरण रैली, रक्तदानासाठी केले आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : संत निरंकारी मंडळाचा वतीने १ ऑक्टोबर रोजी संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता आज शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी शहरात जनजागरण रैली काढत शहर वासीयाना रक्तदानाचे महत्व सांगत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
संत निरंकारी मंडळ सामाजिक उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तसेच जिल्हात सूद्धा ठिकठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करीत असते. शिबीराला निरंकारी स्वंयसेवकासह नागरीकांचा मोठा सहभाग असतो यावेळी येथे आयोजित रक्तदान शिबीराकरीता आज बाजारपेठेसह शहरात आवाहन करण्यात आले. याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे शाखा प्रमूख मुखी माधवदास निरंकारी, माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, सेवादल संचालक, दिलीप निरंकारी, सेवादल शिक्षक अजय पूस्तोडे, यशवंत सहारे, देवेन्द्र शूद्धलवार, गजानन गायकवाड़, संदीप मेश्राम, दूर्ग पूजारी, रोहीत खडाधार, ओमकार प्रधान, निखील राऊत, प्रणय कोहळे तसेच सर्व सेवादल हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here