सर्च’ रुग्णालयात व्हेरिकोज व्हेन सर्जरी कॅम्प

190

The गडविश्व
गडचिरोली, ०४ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात डॉ. आशुतोष आहेर यांच्या नेतृत्वात २८ ते २९ जून २०२४ दरम्यान व्हेरिकोज व्हेन शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे.
आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यतः दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे मराठीत ‘अपस्फित नीला’ असे म्हणतात. अनेकदा या रक्तवाहिन्या पायाच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसू लागतात. बरेचदा रक्तवाहिन्या दिसत नसल्या तरी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असू शकतो. ज्या रूग्णांना पायाच्या शिरा फुगणे , पाय दुखणे, पायाला सुज येणे, पायाच्या न भरणाऱ्या जखमा, रक्त वाहिन्यांच्या गुठळ्या, पाय काळा पडणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी २५ जून २०२४ पूर्वी सर्च रुग्णालयात येउन ऑपरेशनपूर्व तपासणी करुन घ्यावी व या शिबिरासाठी आपले नाव नोंदवून घ्यावे.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांना शस्त्रक्रियेची उत्कृष्ट सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने व्हेरिकोज व्हेन सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल, तरी रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून सर्जरी करिता आपले नाव नोंदवावे व ऑपरेशन सुविधेचा लाभ करून घ्यावे असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here