–परिसरात दहशतीचे वातावरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून रानटी हत्तीने प्रवेश करून धुमाकूळ माजवाला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हत्ती प्रवेश करून आणखी उपद्रव माजवत असतांना दिसत असून का २५ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्रोच्या सुमारास हत्तीने हिदूर गावात प्रवेश करत तीन महिलांना गंभीर जखमी केल्याची घटना उडघडकीस आली आहे. महारी देवू वड्डे (वय ५०), राजे कोपा आलामी ( वय ५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहे. कधी वाघांचा, डुकरांचा, रानगव्याचा तर कधी हत्तीचा धुमाकूळ जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात ओडिशातुन आलेल्या रानटी हत्तीने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अशातच गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातून तेलंगणा राज्यात गेलेल्या एका हत्तीने पुन्हा यूटर्न मारत जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कियर येथे प्रवेश करत काल २५ एप्रिल रोजी शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले. त्यानंतर हत्तीने रात्रोच्या सुमारास हिदूर येथे प्रवेश करत तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून दहशतीत आहेत. जखमी तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुखापत अधिक असल्याने पुढील उपचाराकरिता त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका महिलेचे दोन्ही पाय व पोटाला गंभीर इजा झाल्याने प्रकृती चिंताजनक आहे तर दोघींना अपंगत्व येण्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रानटी हत्तीचा बंदोबस्त करा
जिल्ह्यात रानटी हत्तीने धुमाकूळ माजवत शेतीचे नुकसान केले त्याचबरोबर नागरिकांनाही इजा पोहचवली आहे. हत्तीच्या हल्ल्यात काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. येथील लोकप्रतिनिधी सुद्धा रानटी हत्तीचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी रेटून धरली आहे. जर तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा सुद्धा इशारा दिला आहे. त्यामुळे आता वनविभाग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. बंदोबस्त न केल्यास मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #bhamaragadh #elephanatattack #wildelephant )