पोलीस-नक्षल चकमकीत नक्षली ठार ; एक जवानही शहीद

2923

– परिसरात शोधमोहीम सुरू, साहित्य जप्त
The गडविश्व
कांकेर, दि.०३ : जिल्ह्यातील छोटाबेलीया पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिदूर येथे रविवारी पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षली ठार झाला जर पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती आहे.
हिदूरच्या जंगल परिसरात नक्षल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे कांकेरचे जवान परिसरात शोधमोहीम राबवित असतांना हिदूरच्या जंगलात पोलीस-नक्षल चकमक उडाली. दरम्यान या चकमकीत बस्तर फायटरचे कॉन्स्टेबल रमेश कुरेठी रा. संगम, पखंजूर हे ही शहीद झाले. तर चकमकी नंतर घटनास्थळाची झडती घेतली असता एक नक्षली ठार झाल्याचे आढळुन आले. त्याकडून एके-४७ जप्त करण्यात आल्याची माहिती असून मृतदेह जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी व परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे कळते.

(#thegdv #thegadvishva #sscexam #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #kanker #cgpolice #12exam #palspolio #पल्स_पोलिओ_मोहीम #naxalarrest #police #naxal )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here