The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. २० : स्थानिक नगरपंचायतच्या आज घेण्यात आलेल्या वार्षिक विषय समीतीच्या निवडणूकीत सभागृहातील तिनही पक्षाच्या प्रत्येकी एका सदस्याला सभापती पदावर सर्वानूमते संधी देण्यात आली आहे.
यावेळी भाजपा व काँग्रेस यांनी आपल्या मागील वर्षाचा चेहऱ्यांनाच पुन्हा संधी दिली आहे तर शिवसेने मात्र भाकरी फीरवत यावेळी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. येथे आज घेण्यात आलेल्या निवडणूकीत बांधकाम समीती ही उपाध्यक्ष कलाम शेख यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे तर आरोग्य व स्वच्छता समीतीवर भाजपाचे घनश्याम झोळे यांची पूर्ववत निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समीतीवर काँग्रेसच्या कुंदा तितीरमारे व उपसभापती पदावर भाजपाच्या दूर्गा गोटेफोडे यांना कायम ठेवण्यात आले आहे. मात्र पाणी पुरवठा व जलनिस्सारन समीतीवर यावर्षी शिवसेनेने बदल करीत जयेंद्र सिंह चंदेल यांच्या एवजी अशोक कंगाले यांची निवड केली आहे.
सदर निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी विवेक साळूंखे, साहायक पीठासीन अधिकारी मूख्याधिकारी पंकज गावंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. सर्व पक्षाना समसमान संधी देण्यात आली त्यामूळे खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमूख सुरेंन्द्रसिंह चंदेल, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, माजी नगराध्यक्ष डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर, काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष आशा तूलावी, शिवसेना गटनेता आशिष काळे, पूंडलीक देशमुख, विजय पूस्तोडे तसेच सर्व विद्यमान नगरसेवक हजर होते.
