The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : देशात छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगाणा या चार राज्यांचे निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निकालांमध्ये तीन राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने निकाल लागलेला नसला तरी तेलंगाणा मतदारांनी कॉंग्रेस पक्षावर विश्वास दाखवून कॉंग्रेस पक्षाला विजयी केले.
छत्तीसगड येथील कांकेर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ८ विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांचेवर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हणून पक्षाच्या वरिष्ठांनी जबाबदारी सोपविली होती. हि जबाबदारी व वरिष्ठांचा योग्य ठरले असून कांकेर लोकसभेत येणाऱ्या ८ जागेपैकी ५ जागेंवर विजय मिळवण्यास डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या नेतृत्वाला मोठ यश आले.
कांकेर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अवघ्या १६ मतांनी त्यांचा पराभूत झाले तर, एका विधानसभा क्षेत्रात आपलेच मत विभाजन होऊन उमेदवार पराभूत झाले असे २ जागांवर फार कमी मतांनी कॉंग्रेस उमेदवारांचा पराजय झाला.
कांकेर लोकसभा क्षेत्रातील जनतेनी दिलेल्या या विश्वासाला कॉंग्रेस पक्ष कधीही तडा जाऊ देणार नाही. त्या भागातील विकासाला कॉंग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात कॉंग्रेस विजय होऊन केंद्रात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करेल असा विश्वास आहे असे माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी व्यक्त केले.
